अगदी उंचच उंच...
आभाळाला भिडणाऱ्या...
....आभाळाच्या पार घेऊन जाणाऱ्या
स्वप्न पायऱ्या
घेवून येते ही रात्र.... !!
ठरवते मग मीही ..
आज आभाळ गाठायचचं...!!
एकेक स्वप्न पायरी
मागे सारत सारत
जात राहते पुढे.......
..............
आभाळ अगदी जवळ दिसू लागतं..
हाताच्या अंतरावर...
....................
आणि तेवढ्यात
’तुझी’ स्वप्न पायरी येते..
आणि पाय थबकतात...
बसून राहते मग तिथेच....
..
खर तर अगदी
दोन पायर्यांवर असतं आभाळ...
पण
काय करू म्हणा त्याचंतरी
.
.
.
तुझ्याशिवाय...